Type Here to Get Search Results !

सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वसंत कांबळे लाच घेताना अटकेत ; कांबळे जत पोलीस ठाणे येथे कार्यरत; चार वर्षात जत पोलीस ठाण्याकडील चार वर्षात चार अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात; चक्क फिर्यादीकडेच लाचेची मागणी


सहाय्यक पोलीस निरीक्षक 
गजानन  वसंत कांबळे लाच घेताना अटकेत 
कांबळे जत पोलीस ठाणे येथे कार्यरत; चार वर्षात जत पोलीस ठाण्याकडील चार वर्षात चार अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात; चक्क फिर्यादीकडेच लाचेची मागणी  
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत/प्रतिनिधी: वीस हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे याला पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले.  मागील चार वर्षांत जत पोलीस ठाण्यातील चार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.
जत तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील काही शेतकऱ्यांना एका सोलर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 20 लाख रुपयांना फसविले. या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जत पोलिसांना फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे यांच्याकडे दिला होता. 
सदरच्या गुन्ह्यातील तपास हा गजानन कांबळे करीत होता परंतु गुन्ह्याचा तपास करीत असताना त्याने यातील आरोपींना अटक करण्यासाठी फिर्यादीकडेच लाचेची मागणी केली होती. फिर्यादीकडे 2 लाखांची लाच त्याने मागितली होतो. परंतु एवढी मोठी रक्कम फिर्यादी कडून मिळणार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने 20 हजार रुपये मागितले  फिर्यादी यांनी 20 हजार देण्याचे कबूल केले. त्यानुसार रक्कम दिली जाणार होती.
फिर्यादीने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जत पोलिस ठाण्यात सापळा रचला. 20 हजारांची लाच घेताना कांबळे याला पोलीस ठाणे येथेच रंगेहाथ  पकडले.कारवाईत पोलिस कर्मचारी संजय कलगुटगी, भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, बाळासाहेब पवार, अविनाश सागर आदी कर्मचारी सहभागी झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies