फोंडशिरस गटावर कब्जा मिळवत खासदार गटाचा चौकार; चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर,दत्तू वाघमोडे फोंडशिरस गटातून विजयी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

फोंडशिरस गटावर कब्जा मिळवत खासदार गटाचा चौकार; चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर,दत्तू वाघमोडे फोंडशिरस गटातून विजयी


फोंडशिरस गटावर कब्जा मिळवत 
खासदार गटाचा चौकार 
चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर,दत्तू वाघमोडे 
फोंडशिरस गटातून विजयी 
माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते व फोंडशिरस गटातील सर्व उमेदवार विजयी 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असुन खा. विजयसिंह मोहीते पाटील गटाने फोंडशिरस  गटामधून अनुक्रमे चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर,दत्तू वाघमोडे यांनी विजयी झेंडा पुन्हा सलगपणे फडकावत माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते, फोंडशिरस असा विजयाचा चौकार मारत एकतर्फी विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. 
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खासदार गटाचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये फोंडशिरस गटातून चंद्रकांत शिंदे ४०२४, संजय कोरटकर ४१५३ , दत्तू वाघमोडे
३९४० घेत विजय संपादन केला व विजयाचा चौकार फोंडशिरसच्या नावाने मारला. तर विरोधी पद्मजादेवी मोहिते पाटील गटाच्या संजय दाभाडे १०४६ , सुनील माने १०३४, मधुकर वाघमोडे १०४९ एवढी मते मिळाली. या गटातील १५२ मते अवैध्य ठरली.
माळशिरस गट क्र. १ व इस्लामपूर व आता नातेपुते उत्पादक व फोंडशिरस गटातून पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने एकूण आतापर्यंत एकूण १२ उमेदवार निवडून आल्याने खा. विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या तरी खासदार मोहिते-पाटील गटाने विजयाचा चौकार मारल्याने षटकाराकडे वाटचाल सुरु आहे. तर विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.

No comments:

Post a Comment

Advertise