आटपाडीत आज दि. २१ रोजी ॲड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 21, 2018

आटपाडीत आज दि. २१ रोजी ॲड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान

आटपाडीत आज 
ॲड. वैशाली-डोळस यांचे व्याख्यान
संविधान सप्ताहनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हिंदू कोड बिल विषयक भूमिका व संविधानिक महिला आरक्षण व वास्तव या विषयावर व्याख्यान
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी: आटपाडी येथे फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने चलो संविधान की और अभियानांतर्गत भारतीय संविधान जनजागृती सप्ताहानिमित्त भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत औरंगाबाद येथील ॲड. वैशाली-डोळस यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हिंदू कोड बिल विषयक भूमिका व संविधानिक महिला आरक्षण व वास्तव या विषयावर व्याख्यान होणार असून आटपाडी येथील उन्नती महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष इंजिनीयर अनिता विजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी आहेत. सौ. अनिषा रविकिरण जावीर सूत्रसंचालन करणार असून सुष्मिता सुरेश मोटे आभार मानणार आहेत.  महाराष्ट्र ब्रास बँड आटपाडी यांच्या वतीने रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.No comments:

Post a Comment

Advertise