धवलसिंह मोहिते-पाटील पराभूत; विरोधी गटाचे पद्मजादेवी मोहिते-पाटील, भानुदास सालगुडे-पाटील व धवलसिंह मोहिते पाटील हे तीनही पॅनेल प्रमुख पराभूत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

धवलसिंह मोहिते-पाटील पराभूत; विरोधी गटाचे पद्मजादेवी मोहिते-पाटील, भानुदास सालगुडे-पाटील व धवलसिंह मोहिते पाटील हे तीनही पॅनेल प्रमुख पराभूत


धवलसिंह मोहिते-पाटील पराभूत 
विरोधी गटाचे पद्मजादेवी मोहिते-पाटील, भानुदास सालगुडे-पाटील व धवलसिंह मोहिते पाटील हे तीनही पॅनेल प्रमुख पराभूत 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू विरोधी पद्मजादेवी मोहिते-पाटील गटाचे प्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील हे सुद्धा पराभूत झाल्याने विरोधी गटाच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
बोरगाव सहकारी उत्पादक गटातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या गटातून दत्तात्रय चव्हाण ४१२८, बलभीम पाटील ४०९२ व भगवान मिसाळ ३९८१ मते घेत विजयी झाले तर विरोधी गटाच्या सुदर्शन मिसाळ १०९३, धवलसिंह मोहिते-पाटील ११९४, व पांडुरंग शेटे १०१९ एवढी मते मिळाली.
त्यामुळे विरोधी गटाचे पद्मजादेवी मोहिते-पाटील, भानुदास सालगुडे-पाटील व धवलसिंह मोहिते पाटील हे तीनही पॅनेल प्रमुख पराभूत झाल्याने विरोधी गटातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. परंतु खासदार मोहिते-पाटील गटाच्या तगड्या उमेदवारांना पद्मजादेवी मोहिते-पाटील गटातील उमेदवारांनी लढत दिल्याने येथून पुढील निवडणुका ह्या बिनविरोध अथवा एकतर्फी होणार नसल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.

No comments:

Post a Comment

Advertise