प्रशांत लेंगरे दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श युवा भूषण पुरस्काराने सन्मानित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

प्रशांत लेंगरे दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श युवा भूषण पुरस्काराने सन्मानित


प्रशांत लेंगरे दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श युवा भूषण  पुरस्काराने सन्मानित
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगांव/प्रतिनिधी: महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनतर्फे यावर्षी चा दि प्राईड ऑफ महाराष्ट्र एम.जे.एफ. अवॉर्ड. नवी मुंबई महानगरपालिका महापौर जयवंत सुतार वआमदार मंदाताई   म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी शिवसेना पलूस तालुका प्रमुख प्रशांतदादा लेंगरे यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श युवा भूषण 2018 पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करणेत आले.
यामुळे पलूस तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पलूस तालुक्याच्या तसेच सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वकर्तृवाने आपली वेगळी ओळख करून अल्पावधीत जिल्ह्यातील भरकटलेल्या तरुणांना एकत्र आणून वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांचे अनेक राजकीय, समाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Advertise