गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाख मोलाचा : होनमाने - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाख मोलाचा : होनमाने

गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाख मोलाचा : होनमाने
माणदेश एक्सप्रेस न्यूज
वरकुटे म./वार्ताहर : वरकुटे मलवडी येथे प्रा.सचिन होनमाने यांचा वाढदिवस सोहळा व बहुजन युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमला धनगर समाजाचे नेते उत्तमरावजी जानकर, माण पंचायत सभापती रमेशभाऊ पाटोळे, बबनदादा विरकर, म्हसवड नगरीचे नगराध्यक्ष तुषार विरकर, भाजपा अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, युवराज बनगर, तानाजी होनमाने, विनायक मासाळ, पोपटशेठ जेडगे, सचिन पडळकर, रासप अध्यक्ष दोरगे, वरकुटे मलवडीचे सरपंच बाळासाहेब जगताप, सदाशिव बनगर, सुरेश बनगर, चेअरमन भारत अनुसे, सागर बनगर, तानाजीशेठ बनगर, प्रल्हाद अनुसे, बंडुशेठ आटपाडकर, रामभाऊ नरळे व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळेस उत्तम जानकर बोलताना म्हणाले होनमाने सर यांच्या सारखा युवक जनसामन्याचा अडचणीसाठी झगडत आहे. त्यांचा पाठीशी युवकांनी उभा रहावे. त्याचबरोबर समाजाचा आरक्षण लढयात ही त्यांच खुप योगदान आहे. या भागातील  लोकांना निवासी डॉ., वायरमेन, तलाठी मिळावे म्हणून त्यांनी जे उपोषण केले त्याला  एका दिवसात यश आले आहे. अशा युवकाचा पाठीशी तुम्ही उभा रहावे असं अवाहन जानकर साहेब यांनी केलं व इथुन पुढच्या काळात कायम मी होनमाने यांच्या पाठीशी उभा आहे.
तर सचिन होनमाने बोलताना म्हणाले की, माझा केलेला सत्कार खरच लाखमोलाचा आहे तो मी कधीच विसरणार नाही. वाढदिवसा निमित्त रक्तदान केलेल्या सर्वांचे मी आभारी आहे. बहुजन युवकानी समाज हितासाठी आपला वेळ द्यावा व व्यसना पासुन दुर रहावे. समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी युवकानी ठेवावी. असे मत होनमाने त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं.
विवेकजी कोकरे म्हणाले, यशवंत युवासेना कायम तुमच्या सोबत आहे. युवकांनी कायम सरांच्या पाठीशी उभे रहावं असं मत व्यक्त केलं. यावेळी बाळासाहेब मासाळ, तानाजी होनमाने, सभापती रमेश पाटोळे, युवराज बनगर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास टिंग्या चित्रपटाचा नायक शरद गोयेकर खास उपस्थित होता. तसेच पंचक्रोशीतील हजारो युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमचे सुत्रसंचालन राहुल पाठक यांनी केले, तर प्रस्तावीक आदर्श पुरस्कार विजेते शिवाजी शिंगाडे यांनी केले. आभार युवा नेते अजित बनगर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise