Type Here to Get Search Results !

भाकपचा दि.२४ रोजी आटपाडी येथे श्रमिक मेळावा;कॉ.स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती

भाकपचा दि.२४ रोजी आटपाडी येथे श्रमिक मेळावा 
कॉ.स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: आज रोजी मोदी सरकारच्या आदी आणि नंतरही असंघटीत क्षेत्रावर कामगार विरोधी धोरणे राबवून सरकार अन्याय करीत आहे. नोटाबंदी झालेपासून आजपर्यंत श्रमिक जनतेचे प्रचंड हाल होत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल दर वाढीने प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामध्ये दुष्काळाने जनता हैराण झाली आहे. त्यासाठी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, कष्टकरी, दुष्काळग्रस्त जनतेला न्याय, मिळवण्यासाठी आटपाडी येथे श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.स्मिता पानसरे ह्या उपस्थित राहणार आहेत. तर मेळाव्याचे उद्घाटक  म्हणून किसान नेते कॉ. बन्सी सातपुते हे हजर राहणार आहेत.मेळाव्यातील दुष्काळी विभागातील जनतेच्या जगण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे मागणी करणे, सर्वांना रेशन सर्वांना पेन्शन, नसेल त्याला घरकुल यासह वयाच्या ५५ वर्षावरील स्त्री-पुरुषांना किमान ५००० पेन्शन मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळणेसाठी व स्वामिनाथन आयोग लागू करावा, असंघटीत क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना किमान १८००० रु. मिळालेच पाहिजे, सर्व प्रकारच्या स्कॉलरशीप पुन्हा सुरु करण्यात याव्यात, दुष्काळी भागातील सर्व शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्यात यावीत या प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत. 
यासाठी आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिर हॉल येथे दुपारी ठीक १ वाजता हजारोच्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉ. बाबासाहेब गळवे व कॉ. तानाजी गळवे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies