Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा परिषद राष्ट्रीय पुरस्कार ही पटकावेल: संग्रामसिंह देशमुख


सांगली जिल्हा परिषद राष्ट्रीय पुरस्कार ही पटकावेल: संग्रामसिंह देशमुख
माणदेश एक्स्प्रेस न्युज
कडेगांव/प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेने केलेल्या आदर्श व पारदर्शी कारभारामुळे व विशेषता शिक्षण विभागाबरोबर सर्वच विभागांनी केलेल्या सहकार्यामुळे सांगली जिल्हा परिषदेस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. आणि याच कामामुळे जिल्हा परिषद राष्ट्रीय पुरस्कारासही गवसणी घालेल असा विश्वास सांगली जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. ते कडेगाव पंचायत समिती येथील सी.एम. चषक स्पर्धा आयोजित क्रीडा व कला आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी पलूस तालुका भाजपा युवा अध्यक्ष रोहितनाना पाटील, पलूस शहर अध्यक्ष चंद्रदीप कलडे, सरचिटणीस सचिन जाधव, सोशलमिडीया शाहरुख शिकलगार, कडेगाव पंचायत समिती उपसभापती रविंद्र कांबळे उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, कडेगाव तालुक्यात खेळासाठी चांगले योगदान दिले आहे. येथून पुढे ही जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करीत राहीन. सध्याचे सरकार बारकावे शोधणारे आहे. यामुळे आपणाला चालून संधी आली आहे. त्याचा आपण सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे. सी.एम. चषकाच्या निमित्ताने एक चांगले योगदान लाभणार आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र  मिळणार आहे. याचा उपयोग सरकारी नोकरी मध्ये विचार होणार आहे. यासाठी तालुक्यातील १६ ते २५ वयोगटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी क्रीडा व कला शिक्षकांना आव्हान केले.
यावेळी रोहित पाटील म्हणाले, सी.एम .चषक स्पर्धेला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यामुळे विधानसभानिहाय स्पर्धा आयोजित करण्यात येत असलेला बारा खेळप्रकारासाठी वेळेचा अडसर दूर व्हावी या उद्देशाने काही बदल करण्यात येत आहेत.
सी.एम. चषक स्पर्धा कालावधीत नोंदणी दि.३० नोव्हेंबर पर्यंत विधानसभास्तरीय स्पर्धा व कार्यक्रम दि.१ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत तर जिल्हास्तरीय स्पर्धा  दि.२६ डिसेंबर ते दि.५ जानेवारी तसेच राज्यस्तरीय स्पर्धा दि. ६ जानेवारी ते दि.१२ जानेवारी पर्यंत सर्व विधानसभा व जिल्हा स्तरीय संयोजन समिती आणि भाजपा युवा मोर्चा यांनी आपले स्पर्धा व कार्यक्रम वरील कालावधी प्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रीडा व कला शिक्षकांनी सहकार्य करावे.
यावेळी यशवंत पंचायत राज अभियान 2017-18 मध्ये महाराष्ट्रात सांगली जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक आलेबद्दल संग्रामसिंह देशमुख (भाऊ) अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली यांचा सत्कार कडेगाव पंचायत समिती व शिक्षण विभागाकडून करण्यात आला.
यावेळी कडेगाव पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, क्रीडा व कला शिक्षक उपस्थित होते. क्रीडा शिक्षक यादव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक संजय देशमुख यांनी केले. तर आभार विस्तार अधिकारी राजे साहेबांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies