रात्रीचे वाहने चालवताना काळजी घ्या.बाळसाहेब होनराव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

रात्रीचे वाहने चालवताना काळजी घ्या.बाळसाहेब होनराव

रात्रीचे वाहने चालवताना काळजी घ्या.बाळसाहेब होनराव
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/वार्ताहर : सध्या राज्यातील सर्वच साखर कारखाने सुरु आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने रात्रीची ऊस वाहतूक करणारी वाहने यामध्ये ट्रक्टर, ट्रक ही अवजड वाहने प्रवास करीत असताना. ही ऊसाची वाहतूक करणारी वाहनामध्ये ऊस असल्याने ती रस्त्याच्या खाली उतरत नाहीत. व अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना मागील बाजूस रिप्लेकटर नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळा रात्रीचा प्रवस करीत असताना ही चाललेली वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. तसेच ओव्हरटेक करणाच्या प्रसंगामुळे शक्यतो ऊसाने भरलेले वाहन रस्त्याच्या खाली उतरत नसल्यामुळेही अपघात होतात त्यामुळे  रस्त्यावरून रात्रीचा प्रवास करीत असताना शक्यतो रात्रीचे वाहन चालवताना लाइट डिम फूल मारून ट्रॅक्टर ट्रालीचा अंदाज घ्या जेणेकरून आपण एखाद्या मोठ्या अपघातापासून आपला जीव वाचू शकेल. त्याचबरोबर रस्त्यातील पंक्चर ट्रॉलीचे दगड दिसलेस बाजूला काढा, त्यामुळे एखादा अपघात टळू शकतो. असे आवाहन दिघंची ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवा नेते बाळसाहेब होनराव यांनी केले आहे.
आटपाडी तालुक्यातुन पंढरपूर ते कराड असा कोकण व मराठवाडा यांना जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग गेलेला आहे. त्यामुळे तालुक्यातून गोपूज येथे असणार ग्रीन शुगर, पारे येथील उदगिरी तसेच विटा येथील विराज शुगर, भाळवणी येथील सहकार शिरोमणी, राजेवाडी येथील श्री.श्री.सदगुरु या कारखान्यांना जाणारी ऊसाची वाहतूक करणारी वाहने जात असतात. ही वाहने बऱ्याचवेळा रात्रीचा प्रवास करीत असतात त्यामुळे नागरिकांनी रात्रीचा प्रवास करीत असताना काळजीपूर्वक वाहने चालवावी.

No comments:

Post a Comment

Advertise