सांगलीत २८ रोजी होणाऱ्या बहुजन-ओबीसी परिषदेसाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- घाडगे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

सांगलीत २८ रोजी होणाऱ्या बहुजन-ओबीसी परिषदेसाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- घाडगे


सांगलीत २८ रोजी होणाऱ्या बहुजन-ओबीसी परिषदेसाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- घाडगे 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर :  बहुजन, ओबीसींना आपले न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी व मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी बहुजन ओबीसी जनजागृती परिषदेचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनी सांगली येथे 28 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. तरी बहुजन ओबीसी समाज घटकातील सर्व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सदर परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी नेते दत्तात्रय घाडगे यांनी संत सावतामाळी मंदिर आटपाडी येथे संपन्न झालेल्या बहुजन ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत केले.
यावेळेस ५२ टक्के ओबीसी समाज असतानाही आज छोटे-मोठे घटक आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरत असताना सर्वाधिक असणारा बहुजन ओबीसी मात्र मरगळलेल्या अवस्थेतून जात आहे, ही मरगळ झटकण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपले हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काळाची पाऊले ओळखून सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा घटनेने दिलेल्या हक्कावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे ते म्हणाले.
यावेळेस बहुजन नेते नानासाहेब वाघमारे यांनी सध्या संविधानाला चुकीच्या पद्धतीने नेणाऱ्या प्रवृत्तीवर जोरदार हल्ला चढविला.  ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी सर्व बहुजन ओबीसी घटकांतील प्रतिनिधींची वज्रमुठ असणे ही काळाची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. नाभिक समाजसंघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड यांनी बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधी प्रथमच एकत्र येत असल्याने सर्वांचे अभिनंदन केले. समता परिषदेचे नेते सावंता पुसावळे यांनी बहुजन समाजाने आपल्या हक्कांसाठी लढण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. 
बैठकीच्या सुरुवातीस फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक यु. टी. जाधव यांनी केले. यावेळेस प्रा. नामदेव करगणे, अरुणराव खरमाटे, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर, भारिपचे नेते अरुण वाघमारे, लहुजी साळवे संघटनेचे  संतोष लांडगे, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याणराव काळे, प्रशांत गवळी, कुंभार समाजाचे नेते सोमनाथ कुंभार, प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे, रणजीत ऐवळे, पिनू ऐवळे, साहेबराव चंदनशिवे, अरुण चव्हाण, रवींद्र लांडगे,ज्येष्ठ साहित्यिक सुखदेव नवले, युनूस पठाण, बी.ए. माळी कंन्सट्रक्शनचे विजय माळी, महात्मा फुले युवा मंचचे आप्पासाहेब माळी, रावसाहेब सागर, उत्तम बालटे, बजरंग फडतरे, सुधाकर जाधव, तुकाराम जाधव, रविकांत सोहणी,  सनी कदम, कुमार माळी, अमित फडतरे, सागर राऊत, गणेश दहीवडे, राहूल नवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise