आटपाडी मार्केट यार्डात मका खरेदी केंद्राचे उद्घाटन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

आटपाडी मार्केट यार्डात मका खरेदी केंद्राचे उद्घाटन


आटपाडी मार्केट यार्डात मका खरेदी केंद्राचे उद्घाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात आधारभूत मका धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, उपसभापती दिलीप खिलारी, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य मोहनराव रणदिवे, पंचायत समितीचे सदस्य रुपेशकुमार पाटील, दिघंची ग्रामपंचायत सदस्य केशव मिसाळ, गोडाऊन कीपर सोनवले, पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन शिल्पा भांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऋषिकेश देशमुख, पंढरीनाथ नागणे, राहुल गुरव, डी.एम. पाटील, आर.के. देशमुख, माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भगवानआप्पा मोरे, नंदकुमार निचळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या खरेदी केंद्रात बाजार समितीने सर्व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी मका आधारभुत धान्य खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी मका नोंद असलेला 2018- 19 सालातील सातबारा उतारा, आठ अ  उतारा, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स घेऊन बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करून घ्यावी व त्यानंतरच शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी केले. बाजार समितीचे सचिव जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Advertise