मा.खा.रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारी संस्था गटातून विजयी; पद्मजादेवी मोहिते पाटील पराभूत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

मा.खा.रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारी संस्था गटातून विजयी; पद्मजादेवी मोहिते पाटील पराभूत


मा.खा.रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारी संस्था गटातून विजयी
पद्मजादेवी मोहिते पाटील पराभूत 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असुन अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सहकारी संस्था गटातून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील गटाचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विरोधी गटाच्या पॅनेल प्रमुख पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचा पराभव केल्याने विरोधी गटाच्या आशा पार मावळल्या. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना २७ मते मिळाली तर पद्मजादेवी मोहिते पाटील यांना ८ मते मिळाली.
त्यामुळे श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखाण्यावर खास. विजयसिंह मोहिते पाटील गटाचा विजय निश्चित मानला जात असून अजून निकाल बाकी आहे.
सहकारी संस्था गटातून दोन्ही उमेदवार मोहिते-पाटील घराण्यातील असल्याने व निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदरचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 
निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.

No comments:

Post a Comment

Advertise