Type Here to Get Search Results !

ग्रीन पॉवर शुगर्सचे यंदा सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट-संग्रामसिंह देशमुख; सर्वांच्या बरोबरीने योग्य दर देणार.


ग्रीन पॉवर शुगर्सचे यंदा सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट-संग्रामसिंह देशमुख
सर्वांच्या बरोबरीने योग्य दर देणार.
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
कडेगाव /प्रतिनिधी : ग्रीनपॉवर शुगर्स लि. गोपुज या कारखान्याचे यंदा सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असुन यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन सांगली जि. प.अध्यक्ष व ग्रीन पॉवर शुगर्सचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांनी केले. गोपुज येथे कारखाना कार्यस्थळावर पाचव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक समितीचे सदस्य अविनाश महिगावकर,संचालिका अपर्णाताई देशमुख, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, संचालक दिलीप घार्गे, दत्तूशेठ सूर्यवंशी, नंदकुमार गोडसे, जितेंद्र पवार, जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, विनायक घार्गे, बाबासो घार्गे, भरत जाधव, संभाजी घार्गे, दस्तगिर मुल्ला, उमेश घार्गे, श्रीरंग घार्गे, जयंत घार्गे, नितीन घार्गे, विनोद खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, सभासद व शेतकऱ्यांचा आपल्या कारखान्यावर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. मागील काही दिवसांत या उद्योगात चढ-उतार झाले होते. हे सरकार कारखानदारी  व शेतकरी यांच्यासाठी अनुकूल आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ग्रीन पॉवर ला मदत केली आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण राहणार नाही. दराच्या बाबतीत इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देत आलो आहे. यंदाही सरकार, संघटना व शेतकरी यांच्या बरोबर होणाऱ्या चर्चा समनव्यातुन योग्य दर दिला जाईल. शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता कारखाना घेणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्या हिताचा नेहमीच  विचार करणारा कारखाना म्हणून याकडे पाहिले जाते.

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक समितीचे सदस्य अविनाश महिगावकर आपल्या भाषणात म्हणाले की, दुष्काळी खटाव तालुक्यात एवढी मोठी औद्योगिक कारखानदारी उभारणे सोपे नव्हते. मात्र संग्राम देशमुख यांची जिद्द, सचोटीने हे शक्य झाले आहे. संग्राम देशमुख यांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता या कारखान्याचे पालकत्व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्वीकारले आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान प्रदूषण मंडळा कडून सलग चार वर्षे कारखाना चालू असताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण झाले नसल्याबद्दल  कारखान्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गौरव करण्यात आला व प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यानिमित्ताने संग्रामसिंह देशमुख व अविनाश महिगावकर यांच्या हस्ते कारखान्याचे पर्यावरण अधिकारी संजय सोमदे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन के.एन.यादव यांनी केले 
यावेळी उपसभापती रवींद्र कांबळे, चंद्रसेन देशमुख, डी. जी. पाटील, जिल्हा परिषद सदस्या रेश्माताई साळुंखे, आशिष घागेँ, तानाजी जाधव, बाळासाहेब वत्रे, संदेश दंडवते, पांडुरंग जमदाडे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार गिरीश घाडगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies