एमएसएमई उद्योगांसाठी फक्त 59 मिनिटांमध्ये बँक कर्ज मंजूर योजनेची माहिती देण्यासाठी आज कार्यशाळा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 14, 2018

एमएसएमई उद्योगांसाठी फक्त 59 मिनिटांमध्ये बँक कर्ज मंजूर योजनेची माहिती देण्यासाठी आज कार्यशाळा

एमएसएमई उद्योगांसाठी फक्त 59 मिनिटांमध्ये  बँक कर्ज मंजूर योजनेची माहिती देण्यासाठी आज कार्यशाळा
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 13: अतिसुक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांसाठी फक्त 59 मिनिटांमध्ये 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचे बँक कर्ज मंजूर योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2018 रोजी केली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती गरजूंना व्हावी व त्याचा लाभ गरजू उद्योजकांपर्यंत मिळावा याकरिता बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा प्रबंधक सांगली यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र डीआयसी सभागृह, टाटा पेट्रोल पंपाच्या मागे, विश्रामबाग सांगली येथे होणार आहे. या कार्यशाळेचा गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक बँक ऑफ इंडिया सांगली यांनी केले आहे.
या कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी सांगली, विविध बँकांचे प्रमुख अधिकारी, आयुक्त जीएसटी केंद्र व राज्य, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक, नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी व इतर राज्य व केंद्र सरकारचे प्रमुख अधिकारी व त्याचबरोबर यशस्वी उद्योजक इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेंतर्गत एमएसएमई च्या नवीन उद्योजक व सध्या कार्यरत उद्योजक या सर्वांसाठी बँकेकडून 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचे बँक कर्ज फक्त 59 मिनिटांमध्ये मंजूर करून मिळणार असल्याने गरजू उद्योजकांचा अमूल्य वेळ वाया जाणार नसून ऑनलाईन आणि तेही प्रमाणित वेळेतच कर्ज मंजूर होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise