सिद्धनाथ संस्थेतर्फे 11 टक्के लाभांश वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

सिद्धनाथ संस्थेतर्फे 11 टक्के लाभांश वाटप


सिद्धनाथ संस्थेतर्फे 11 टक्के लाभांश वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : पुजारवाडी (आ) येथील श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना 11 टक्के लाभांश वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील यांनी दै. माणदेश एक्सप्रेसशी बोलताना दिली.
दिघंची येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात सभासद, ठेवीदार यांच्या सदिच्छा भेटीसाठी पतसंस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी हा लाभांश जाहीर करण्यात आला. या संस्थेला ऑडिट वर्ग “अ” असून एन.पी.ए. शून्य टक्के आहे. संस्थेचे वसुली भागभांडवल 80 लाख रुपये, खेळते भांडवल ५ कोटी 30 लाख, ठेवी ३ कोटी 42 लाख, , कर्ज ४ कोटी 38 लाख, गुंतवणूक 35 लाख, नफा १० लाख झाला आहे. तर  थकबाकी 2.03  टक्के असून संस्थेला स्वमालकीची इमारत आहे. 
संस्था बचत ठेवी वर ५ टक्के पासून विविध कालावधीसाठी ११ टक्क्यापर्यंत आकर्षक व्याज देते. तसेच ६ वर्षे ६ महिन्यांमध्ये दामदुप्पट रक्कम तर ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अर्धा टक्के जादा व्याजदर देते. 
संस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक जाधव, सचिव महेश चांडवले, आटपाडीचे सहाय्यक निबंधक कुलकर्णी, नामदेव ढोले, श्रीकांत भांबुरे, गणपत गोंजारी, हणमंत पांढरे, गणपती गोंजारी, महेश साळी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, राहुल पांढ,रे राजू कुंभार, नितीन खटावकर, विकास पाटील, उमेश पाटील सर्व संचालक वर्ग, कर्मचारी, बचत एजंट या कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise