माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्रकुमार कदम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्रकुमार कदम


माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्रकुमार कदम
माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्रकुमार कदम तर सरचिटणीसपदी विजय दादा बनसोडे  रा-देवापूर यांची निवड झाली. विजय बनसोडे यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांची वैयक्तिक कामे तसेच शिक्षकांच्या अडी अडचणी सोडवणे, शिक्षकांच्या सुखा दुखात सहभागी होणे, तसेच सन २०१५ मध्ये शिक्षक समितीच्या माण तालुका सहसचिवपदी   म्हणून काम केले आहे. त्यांच्या या कामांमुळे त्यांनी शिक्षक  संघटनेत आपले स्थान भक्कम निर्माण केले होते.शिवाय प्रत्येक शिक्षकाच्या अडचणीस सहकार्याची मनमिळाऊू भुमिका यामुळे  त्यांची माण तालुका शिक्षक समितीच्या सरचिटणीसपदी बिनविरोध बहुमताने निवड करण्यात आली आहे.
विजय बनसोडे यांच्या निवडीबद्दल शिक्षक समिती महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे, सातारा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे, माण पंचायत समितीचे सभापती रमेशजी पाटोळे, उपसभापती नितीनजी राजगे, सरचिटणिस प्रदीपराव कदम, कार्याध्यक्ष उदयकुमार नाळे, शिक्षक बॅकेचे संचालक किरण यादव, रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी सुशांतकिरण बनसोडे, मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, सातारा जिल्हा बँकेचे हायटेक विभाग असणाऱ्या कृषी विभागाचे कृषीतज्ञ सुरेश बनसोडे सा, शिक्षक समितीचे जेष्ठ मार्गदर्शक शहाज दडस, शिक्षक समितीचे माजी जिल्हाअध्यक्ष  उ.स.वाघमोडे आप्पा, सावळाराम राऊत, आप्पा भानुदास गोंजारी, रामचंद्र कुंभार गुरूजी,  मधुकर कांबळे गुरूजी, जेष्ठ शिक्षक नेते प्रताप आडसर, नंदकुमार तुपे, अजितराव जगदाळे, श्रीकांत दोरगे, श्रींमतराव जगदाळे, धनाजी पोळ, घनश्याम काळे, शिक्षक नेते शिक्षक बॅकेचे माजी संचालक लक्ष्मण काळे, बाबा खरात, काशिनाथ तोरणे, सोपान पोळ तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा कामिनीताई शिलवंत या सर्वानी अभिनंदन करून पुढील त्यांच्या कार्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Advertise