अखेर आबासाहेबांच्या धरणे आंदोलनापुढे पुढे प्रशासन नमले; आंदोलन मागे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 27, 2018

अखेर आबासाहेबांच्या धरणे आंदोलनापुढे पुढे प्रशासन नमले; आंदोलन मागे


अखेर आबासाहेबांच्या धरणे आंदोलनापुढे पुढे प्रशासन नमले; 
आंदोलन मागे 
तिसंगी तलावात पाणी सोडले दि. ३० रोजी जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक 
माणदेश न्यूज नेटवर्क 
कोळा/वार्ताहार: नीरा उजवा कालव्यातून तिसंगी तलाव लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी सोनके, तिसंगी येथील शेतकऱ्यांनी कॅनॉल इनलेटच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू होते. दरम्यान आ. गणपतराव देशमुख, माजी आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली मात्र उपोषणकर्ते ठाम असल्याने आ.देशमुख, माजी आम. साळुंखे शेतकऱ्यांसोबत उपोषणास पाठींबा देवुन झाले सहभागी झाले होते. 

तिसंगी ता. पंढरपुर येथे इनलेट नाला या ठिकाणी  सुरू आंदोलनात आमदार  गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपकआबा  साळुंखे, पांडुरंगचे  संचालक तानाजीराव वाघमोडे, सहकार शिरोमणीचे संचालक भारतनाना कोळेकर, मच्छिंद्र पाटील आदीसह शेतकरी आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले  होते. शासकीय यंत्रनेला ४८ तासाच्या प्रतिक्षेनंतर जाग आली. गुंजवणी धरणातून अर्धा टी.एम.सी. पाणी सोडण्याचे लेखी निवेदन ए. पी. निकम कार्यकारी अभियांता निरा उजवा कालवा फलटण यांनी जलसंपदा मंत्री यांच्या सचिवा बरोबर चर्चा करून लेखी आदेश दिला. यावेळी  प्रांतअधिकारी ढोले उपस्थित होते यानंतर तिसंगी तलावात अखेर पाणी सोडले.
तिसंगी तलावात पाणी सोडणेच्या मागणीसाठी संजय कारंडे, अशोक पवार, माजी सरपंच विजय पवार यांनी  इनलेट नाला येथे आंदोलनास बसले असता आमदार देशमुख यांनी भेट दिली. परिस्थिती पाहुन करून देशमुख आंदोलनात सहभागी झाले. अखेर मंत्री व प्रशासनाला नमती भुमिका घ्यावी लागली व हक्काचे पाणी तलावात सोडण्यास भाग पाडले. आमदार  गणपतराव देशमुख व माजी आम. दीपकआबा साळुंखे यांनी रात्र शेतकऱ्यांसोबत काढली. थंडीत रात्र  झोपुन कॅनलवर  रात्र झोपून काढली होती. यामुळे प्रशासन खडबडुन जागे झाले.
शनिवारी आंदोलन स्थगित 
आमदार  गणपतराव देशमुख यांचे हस्ते आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून चटणी भाकरी खावून संपविण्यात आले.  यावेळी आंदोलनर्ते अशोक पवार, संजय कारंडे, विजय पवार, किरण पाटील यांनी आंदोलन स्थगित केले. याप्रसंगी आमदार भारतनाना भालके, माजी आमदार शाहजीबापू पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, युवक नेते चंद्रकांतदादा देशमुख, सोलापुर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करांडे, पोलिस निरिक्षक किरण अवचर, राजकुमार केंद्रे, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, सरपंच अशोक पाटील, हरिदास थोरात, तानाजी गोफणे, हरिदास थोरात, मल्हारी खरात, महुदचे नेते बाळासाहेब पाटील, युवक नेते चंद्रकांत सरतापे, चेअरमन
अंकुश येडगे, जगदीश कुलकर्णी, दिगंबर येडगे, नगरसेवक गजानन बनकर, हरीदास येडगे, देवीदास गोपने, शिवाजी मोरे, प्रकाश येडगे, ॲड. धनंजय मेटकरी, सरपंच बाळासाहेब ढाळे, जितेंद्र बाजारे, चिकमहुदचे बाबासाहेब बंडगर, संजय गोडसे, दिपक गोडसे, दिपक रुपनर, कोडींबा सिद, विजय ठोबरे यासह आदी सह अनेक तरूण शेतकरी उपस्थित होते.

तिसंगी तलावात पाणी सोडताना ४०० क्युसेकने वेगाने पाणी आणून २०० क्युसेक पाणी तिसंगी तलावात व २०० क्युसेक पाणी कासेगाव, अनवली परिसरातील गावांना देण्यात यावे.या गावाचे हक्काचे पाणी त्यांना देण्यात यावे.
आमदार गणपतराव देशमुख..

अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करूण तिसंगी तलाव भरावा व कासेगाव अनवली, सरकोली, रांजनी परिसरातील गावांना पण नियोजना नुसार पाणी मिळावे..
आमदार  भारत नाना भालके.


No comments:

Post a Comment

Advertise