खरसुंडीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 8, 2018

खरसुंडीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

खरसुंडीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम  
माणदेश न्यूज नेटवर्क  
खरसुंडी/मनोज कांबळे: खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिरात नवरात्रोत्सवास बुधवार ता. १० रोजी घटस्थापनेने सुरवात होत आहे. तर नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस विजयादशमी व साखरवाटप सोहळा शुक्रवार ता. १९ रोजी होणार असल्याची माहिती श्री नाथदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध पातळीवर तयारी सुरु आहे. 
बुधवार ता. १० रोजी दुपारी मुख्य मंदिरात विधीवत घटस्थापना होणार आहे. त्यानंतर मुख्य मंदिरात दररोज त्रिकाळ धुपारती, उस्तव मूर्तीची विविध रूपातील पूजा ,जागर ,मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
ता. १७ रोजी श्री नाथ मंदिरातील हरीजागर, ता. गुरुवार १८ रोजी घटविसर्जन व  हरीजागरासाठी श्रींचे जोगेश्वरी मंदीराकडे प्रस्थान, ता. १९ रोजी विजयादशमी दसरा व साखरवाटप सोहळा होणार असून, सायंकाळी गावसीमोल्लंघन होणार आहे. शनिवार ता. २० रोजी पाशांकुशा एकादशीनिमित्त श्रींचे सीमोल्लंघणासाठी चिंचाळे हद्दीत माळावर प्रस्थान होणार आहे. सायंकाळी गाव ओढयावर शस्त्र पूजन झाल्यानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर, उत्तररात्री श्री नाथमंदिरात आगमण होणार आहे. या. उत्सवाचे नियोजन श्री नाथदेव देवस्थान ट्रस्ट, श्रीनाथ सेवक गुरव समाज संघ व भाविकांच्या सहकार्यातून 
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिरासह अन्य ठिकाणी तयारी सुरु आहे. साफसफाई, धुपारती मार्गावर मंडप व विद्युत रोषणाई अशी कामे प्रगतीपथावर आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise