तुषार ठोंबरे यांच्या हस्ते महिलांना गॅस वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 28, 2018

तुषार ठोंबरे यांच्या हस्ते महिलांना गॅस वाटप


तुषार ठोंबरे यांच्या हस्ते महिलांना गॅस वाटप
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
 विटा/प्रतिनिधी : दि.२७रोजी पारे येथे महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून युवा नेते तुषार ठोंबरे यांच्या हस्ते महिलांना गॅस वाटप करण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाकासाठी लाकडी सरपन वापरल्यामुळे  लहान बालक व महिलांना होणाऱ्या  त्रासांची तक्रार दूर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महिलांच्या आरोगयामध्ये सुधारणा घडवून आणणे, प्रदूषण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मत यावेळी तुषार ठोंबरे मांडले.
सुधारित धोरणानुसार आता  गॅस मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाजातील घटकासाठी, अंत्योदय योजनेत असणाऱ्या व्यक्तींना तसेच  ज्या गावामध्ये वनक्षेत्र आहे अशा गावातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या वेळी युवा नेते तुषार ठोंबरे, कार्याध्यक्ष अमोल सावंत, उषा मारुती सावंत, सुषमा सुधीर सावंत, सविता प्रकाश एटमे, संजीवनी कुंडलिक, लक्ष्मण लोखंडे, सुधीर सावंत, मल्हारी साठे, संस्थान सोंडे, उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise