पुढील महिन्यात बँका राहणार निम्मे दिवस बंद? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 27, 2018

पुढील महिन्यात बँका राहणार निम्मे दिवस बंद?


पुढील महिन्यात बँका राहणार निम्मे दिवस बंद?
माणदेश न्यूज नेटवर्क 
आटपाडी :  नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धनत्रयोदशी (दि. 5), नरकचतुर्दर्शी (दि. 6), लक्ष्मीपूजन (दि. 7), पाडवा (दि. 8) आणि भाऊबीज (दि. 9) असा क्रम असून, त्यानंतर दि. 10 आणि 11 तारखेला शनिवार आणि रविवार आहे. 
सोमवारी (दि.12)  रोजी बँक उघडणार मात्र 13 आणि 14 नोव्हेंबरला काही राज्यामध्ये पुन्हा बँकांना छठ पूजा उत्सव निमित्त सुट्ट्या असून  बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंड येथे छठ पूजा उत्सव साजरा करण्यात येणार.
 छठ पूजेनंतर 21 नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि 24 नोव्हेंबरला गुरू तेग बहादुर शहीद दिवस आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती येत आहे. यादरम्यान अधिकाधिक राज्यात सरकारी सुट्ट्या असतात. No comments:

Post a Comment

Advertise