Type Here to Get Search Results !

केन अॅग्रो ची ऊस बील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार: पृथ्वीराज देशमुख


केन अॅग्रो ची ऊस बील 
दोन दिवसात शेतकऱ्यांच्या  खात्यावर जमा करणार: पृथ्वीराज देशमुख
माणदेश न्यूज नेटवर्क
कडेगांव/प्रतिनिधी: केन  अॅग्रो एनर्जी (इंडिया) लि.या साखर कारखान्याकडे सन २०१७-१८च्या गळीत हंगामामध्ये सांगली,सातारा जिल्ह्यातुन गाळपास आलेल्या ऊसापैकी राहीलेल्या ऊसाची उर्वरीत एफआरपी प्रमाणे होणारी रक्कम प्रतिटन २ हजार ५२५ रू.दराने शेतकऱ्यांची ऊस बील संबंधीत जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन दिवसात जमा करणेत येणार आहे.अशी माहिती केन अॅग्रो एनर्जी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे. कडेपुर येथे केन अॅग्रो साखर कारखान्याच्या ऊस बिलाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज देशमुख बोलत होते. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना ऊस बील वेळेत देता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु येत्या दोन दिवसांत ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत आहोत.गेली दोन तीन दिवस कारखान्याच्या साखरे बाबत चुकीचे विधान करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आहे.त्यामुळे बॅकांनी तारण ठेवलेल्या कारखाना स्थळावर साखर गोदामांची तपासणी करून खातर जमा करून घेतली आहे. लोकांची फक्त दिशाभुल करून कारखान्या समोर अडचणी निर्माण करण्याचा उद्योग बंद करावा व शेतकऱ्यांच्यात दिशाभुल करण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार असुन असे प्रकार घडु नयेत. वास्तविक केन अॅग्रो एनर्जी साखर कारखान्याकडे साखर उत्पादनाबरोबर डिस्टीलरी व को-जनरेशन नसताना कारखान्याने सन २००९-१० ते२०१७-१८ या गेल्या ९ वर्षात ऊसपुरवठा शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जादा रक्कम रूपये १९२ कोटी त्यांचे बॅक खातेवर जमा केलेले आहेत. आमचेकडे कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसतानाही इतर उपपदार्थ निर्मिती क्षमता असणाऱ्या कारखान्याच्या बरोबरीने दर देण्याचा केन अॅग्रो कारखान्याने सातत्याने प्रयत्न केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २५ हजार मे.टन ऊसाचे उत्पादन होत होते.केन अॅग्रो कारखान्याने टेंभु, ताकारी उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्न करून आजरोजी कारखान्याचा स्वत:च्या सभासदाच्या मालकीचा अंदाजे ८ लाख मे.टन ऊस उभा केलेला आहे. यावर्षी कारखान्याची ७० हजार लिटर क्षमतेची डिस्टलरी उभारणेचे काम अंतिम टप्यात असुन माहे जानेवारी २०१९मध्ये कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यानंतर उत्पन्नात वाढच होणार आहे व शेतकऱ्यांना लवकर ऊसबील अदा करणे सोपे होईल.यावर्षी एफआरपी प्रमाणे रक्कम अदा करणेस विलंब झाला परंतु ऊस उत्पादक सभासदांनी केन अॅग्रो एनर्जी कारखान्यावर पुर्णपणे विश्वास दाखवला आहे.ज्या लोकांचा ऊसच कारखान्यास गाळपास आला नाही तेच लोक राजकीय षडयंत्र रचुन कारखान्यास बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे  ते योग्य नाही. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याने स्थापने पासुन उपपदार्थ निर्मिती असणाऱ्या कारखान्याच्या बरोबरीने दर दिला आहे. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा केन अॅग्रो कारखान्यावर पुर्णपणे विश्वास आहे. परंतु जाणुनबुजून राजकीय पोळी भाजण्यासाठी एफआरपी चे कोलीत हाती घेवुन कारखान्याशी काहीही सुतराम संबंध नसलेली मंडळी कारखान्यास बदनाम करण्यासाठी धडपडत आहेत ते सहन केले जाणार नाही. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत जसा विश्वास ठेवला आहे तसाच विश्र्वास कारखान्यावर ठेवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies