शिवशंभो वृध्दाश्रम सेवा मंडळाचा दुसरा वर्धापन साजरा; वर्धापनदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्विनी पाटील यांचा सत्कार संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 18, 2018

शिवशंभो वृध्दाश्रम सेवा मंडळाचा दुसरा वर्धापन साजरा; वर्धापनदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्विनी पाटील यांचा सत्कार संपन्न


शिवशंभो वृध्दाश्रम सेवा मंडळाचा दुसरा वर्धापन साजरा 
वर्धापनदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्विनी पाटील यांचा सत्कार संपन्न 
माणदेश न्यूज नेटवर्क 
नेर्ले: नेर्ले येथील शिवशंभो वृध्दाश्रम सेवा मंडळ ट्रस्ट नेर्ले ता. वाळवा जि.सांगली या आश्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार दि.14/10/18  रोजी सकाळी 11:00 वा.आश्रमात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महा.प्रदेश कॉंग्रेस चे सरचिटणीस  सत्यजित देशमुख(भाऊ), शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती शिराळा चे सभापती सुजित देशमुख, अदिती उद्योग समूह नेर्लेचे प्रमुख पृथ्वीराज पाटील, सामाजिक कार्यकर्त्या  सौ.अश्विनी हणमंत वेताळ- पाटील, शांताई फाऊंड़ेशन कराड चे सुभाष पाटील (आबा) , य.मो. कृ सह साखर कारखाना लि. रेठरे॥बु॥ चे  संचालक जयकर कदम, किरण थोरात, जालींदर पाटील (आप्पा), अवधूत कुलकर्णी व वृध्दांचे नातेवाईक  यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात पार पडला. 
तसेच सौ.अश्विनी वेताळ-पाटील यांना विश्वशांतीदुत राज्यस्तरीय पुरस्कार (उत्कृष्ट सामाजीक कार्य) मिळाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.

यावेळी  संस्थेचे अध्यक्ष दिनकर मोहीते(आण्णा), उपाध्यक्ष संदिप मोहीते (भाऊ) सचिव
हणमंत पाटील(बापु),  खजिनदार हणमंत मोहीते(दादा), सदस्य प्रकाश धनवडे, सुरेश धनवडे, डॉ. तुळसीदास पाटील, सदस्या सौ.कमल मोहीते,  सौ.मनिषा माने व्यवस्थापक निवास कांबळे महिला कर्मचारी सौ.कविता चव्हाण, सौ.मंगल पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Advertise