गुणवंत मुले हिच शाळेची संपत्ती: ढोले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

गुणवंत मुले हिच शाळेची संपत्ती: ढोले


गुणवंत मुले हिच शाळेची संपत्ती: ढोले
माणदेश एक्सप्रेस न्यूज
वरकुटे मलवडी/वार्ताहर: शालेय जीवनामध्ये खेळाला फार मोठे महत्त्व आहे. शारीरिक क्षमतेबरोबरच विद्यार्थ्यांच्यात एकाग्रता, सहनशीलता,आत्मविश्वास इत्यादी सर्वांगीण गुणांचा विकास खेळामुळे होतो. गुणवंत मुले हिच शाळेची संपत्ती आहेत, मुलांच्या विकासासाठी शिक्षकांबरोबर पालक ग्रामस्थ आणि हितचिंतकांचे सहकार्य मोलाचे असते अशा प्रकारचे प्रतिपादन मुख्याध्यापक मधुकर ढोले यांनी केले. ते यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये विभागीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.
 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत अनुसे, माजी चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते सुनील थोरात, मा.सरपंच प्रल्हाद अनुसे, पाणी संघर्ष चळवळीचे बापुराव बनगर, महावीर काटकर, जि.प.शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष बाबासाहेब मंडले आदी मान्यवरांसह शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी कु.दिक्षा अंकुश वणवे (३००० मीटर चालणे), कु.स्नेहल संतोष पोळ (लांब उडी), यशराज संजय जगताप (८० मीटर अडथळा शर्यत) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर घवघवीत यश मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संजय जगताप, प्रकाश ठोंबरे सर यांनी मार्गदर्शन केले. तर सांगली येथे होणाऱ्या विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी मनोभावे शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमात क्रिडाशिक्षक संजय जगताप सर व आदर्श पत्रकारितेबद्दल सिद्धार्थ सरतापे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश ठोंबरे सर यांनी केले तर शेवटी आभार नामदेव पिसे सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise