मंगरूळ च्या कु.स्वप्नाली शिंदे ची कला क्षेत्रात यशस्वी भरारी; जिल्ह्यात उत्तेजनार्थ आल्याबद्दल तुषार ठोंबरे यांच्या हस्ते तिचा सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 27, 2018

मंगरूळ च्या कु.स्वप्नाली शिंदे ची कला क्षेत्रात यशस्वी भरारी; जिल्ह्यात उत्तेजनार्थ आल्याबद्दल तुषार ठोंबरे यांच्या हस्ते तिचा सत्कार


मंगरूळ च्या कु.स्वप्नाली शिंदे ची  कला क्षेत्रात यशस्वी भरारी
जिल्ह्यात उत्तेजनार्थ आल्याबद्दल तुषार ठोंबरे यांच्या हस्ते तिचा सत्कार
माणदेश न्यूज नेटवर्क 
विटा/प्रतिनिधी: दि. 25, कला ही जीवनाची सार्थकता असते माणसात आनंद ऊर्जा आणि चेतना देण्याची ताकद  संगीतामध्ये असते त्याच उमेदीने संगीतात अजरामर  कलाकार या महाराष्ट्रात उदयास आले.
 तोच वारसा पुढे चालवत स्वप्नाली पांडुरंग शिंदे या सातवीतील विद्यार्थिनीने गायनावर आपला ठसा उमटविला आहे. लहानपणापासून गीत गायनाची प्रचंड आवड आणि ही आवड जोपासण्यासाठी अथक परिश्रम घेत जिल्हा परिषदेच्या मंगळूर शाळेत इयता सातवी स्वप्नाली  पांडुरंग शिंदे हिने घेतले आहेत. तालुक्यात गीत गायन स्पर्धेत यश संपादन केले. हीच घोडदौड कायम ठेवत सांगली जिल्ह्यात उत्तेजनार्थ  आल्याबद्दल  तुषार ठोंबरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.  यावेळी तिचे पालक पांडुरंग शिंदे उपस्थित होते. 
निकम सर,  गुरव सर,  शिकलकर सर, खाडे मॅडम, विद्या मॅडम व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले.  या कलेला वाव देण्यासाठी कु. स्वप्नाली चे आई-वडील यांची साथ व शिकलगार  सर यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. पालक व सर्व स्टाफ च्या वतीने स्वप्नाली चा सत्कार करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली  सर्व परिसरातून कुमारी स्वप्नाली पांडुरंग शिंदे हिचे कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment

Advertise