शिंदी बु. येथे विविध विकासकामांचा शुभारंभ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 17, 2018

शिंदी बु. येथे विविध विकासकामांचा शुभारंभ


शिंदी बु. येथे विविध विकासकामांचा शुभारंभ 
माणदेश न्यूज नेटवर्क : शिंदी बुद्रुक (ता.माण) येथे ग्रामपंचायतच्या वतीने 14 व्या वित्त आयोगमधून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, मुरमीकरण,कॉंक्रीटीकरण इत्यादि कामांचा समावेश आहे. याचबरोबर संविधान मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपणही मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  यावेळी मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना, भविष्यातही विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच शशिकांत इंगळे,नंदूभाऊ इंगळे,धनाजी इंगळे,आबू खरात आदि ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिति माणचे अधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले. बाळासाहेब रणपिसे यानी मनोगत व्यक्त केले, किरण खरात यानी प्रस्ताविक केले ,कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी प्रभाकर खरात, रघुनाथ खरात, शैलेश खरात, राम खरात,सचिन खरात आदिनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise