Type Here to Get Search Results !

शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेतील विद्यार्थींनी दिवाळीसाठी बनविल्या आकर्षक भेटवस्तू


शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेतील विद्यार्थींनी दिवाळीसाठी बनविल्या आकर्षक भेटवस्तू
पंढरपूर येथील शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेतील उपक्रम 
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
श्रीपुर/वार्ताहर : पंढरपूर येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी अकष॔क वस्तू बनविल्या आहेत त्यामध्ये  भेटकार्ड, पणत्या, आकाशदिवे,पायपुसणी, मेणबत्त्या, उदबत्या,इ.वस्तू बनविल्या आहेत.
गेली अनेक दिवसांपासून हे  विद्यार्थीं बनवत असुन भरपुर प्रमाणात या वस्तु बनवल्या पण  असुन म्हणावा तसा प्रतिसाद लोकांकडून प्रतिसाद  मिळत  नाही अशी खंत या अंधशाळेतील विद्यार्थींनी व्यक्त केली. शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळा ही 1991 साली स्थापन झाली तेव्हा पासून आजपर्यंत ही संस्था  कार्यान्वित असुन या शाळेमध्ये सर्व जाती धर्मातील 4 ते 16 वर्ष वयोगटातील  अंध मुलां, मुलींना इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे स्वखर्चाने मोफत पुर्ण निवासी शिक्षण दिले जाते. या अंधशाळेमध्ये फक्त तीस विद्यार्थी मान्यता असून  या शाळेमध्ये पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पुर्ण निवासी मोफत शिक्षण घेत आहेत. कारण प्रत्येक अंध मुलाने कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी बनून  देशाच नाव उज्वल करण्याच काम त्यांच्या हातुन घडावे या उद्देशाने शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळा नेहमी प्रयत्न करत असते व करत राहिल असे मत शहिद जवान मेजर कुणालगीर गोसावी याचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी व्यक्त केले. 

या शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी बनवलेली दिवाळी शुभेच्छा भेटकार्ड  हे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना गेली वीस वर्षे प्रत्येक दिवाळीला या शाळेतील अंध विद्यार्थी स्वतःच्या हताने बनवलेल्या भेटवस्तू प्रत्येक वर्षी देऊन  शुभेच्छा देत असतात.
आम्ही तयार केलेल्या  दिवाळीसाठीच्या या आकर्षक भेटवस्तूना लोकांनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही तरी लोकांनी इतरत्र  या भेटवस्तू खरेदी न करता आम्ही बनवलेल्या वस्तू खरेदी करुन आम्हास प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे अशी आशा यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies