वाळूतस्करी करणाऱ्या म्हसवड पोलिसांनी केले जेरबंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

वाळूतस्करी करणाऱ्या म्हसवड पोलिसांनी केले जेरबंदवाळूतस्करी करणाऱ्या म्हसवड पोलिसांनी केले जेरबंद
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
म्हसवड/अहमद मुल्ला :  म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या पप्पू गुलाब जाधव रा. सदाशिवनागर ता.माळशिरस जि. सोलापूर यांच्यावर म्हसवड पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.
म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली असून वाहतूक पोलीस एस.पी. बागल यांनी सदर घटनेची फिर्याद पोलिसात दिली आहे.
चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यावर म्हसवड पोलिसांची धडक कारवाई सुरूच असून सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात विनापरवाना चोरटी वाळूची वाहतूक करणारा ट्रक शिंगणापूर मार्गे जाणार असल्याची माहिती मिळानंतर म्हसवड पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस एस.पी. बागल, सहायक पोलिस निरीक्षक देशमुख, पो.कॉ.धुमाळ, बर्गे हे सर्व खाजगी वाहनाने शिंगणापूर रस्त्याने शेंबडेवस्ती येथे थांबले असता पप्पू जाधव हा लाल रंगाच्या अशोक लेलँड क्रमांक MH-12-HD967 मधून विनापरवाना चोरटी वाळूची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले.
 चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याच्या कारणावरून पप्पू जाधव यांच्यावर कारवाई करीत अशोक लेलँड अंदाजे किंमत ४ लाख व वाळू ४ ब्रास अंदाजे किंमत १२ हजार असा सुमारे ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.

No comments:

Post a Comment

Advertise