Type Here to Get Search Results !

आटपाडीत योग शिबिराचे आयोजन; महिलांसाठी स्वतंत्र व्यव्यस्था


आटपाडीत योग शिबिराचे आयोजन; महिलांसाठी स्वतंत्र व्यव्यस्था 
माणदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी/वार्ताहर : आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनपद्धतीत भारतीय संस्कृतीचा उत्तम आविष्कार असलेल्या योगसाधनेचे नितांत आवश्यकता आणि केवळ वेळ नाही असे म्हणून, स्वतःच्या अनमोल शरीराकडे दुर्लक्ष करतो. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते, नि आपल्या विचारसरणीत जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले योग शिबिर रविवार दिनांक 21 ऑक्टोबर ते शनिवार 27 ऑक्टोंबर 2018 रोजी खास आटपाडीतील बंधु-भगिनींसाठी आयोजित करण्‍यात आले आहे.
या योग शिबिरास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गुरुवर्य योगाचार्य श्री अशोक सिद्धू आवळेकर व योग शिक्षिका श्रीमती प्रतिभा पद्माकर पोतदार हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये शुद्धिक्रिया, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, योगनिद्रा यांचे शास्त्रशुद्ध विवेचन, प्रात्यक्षिक व योगसाधना शिकविण्यात येणार आहेत.

आटपाडीतील दुष्काळाचा विचार करून फक्त ३०० रुपये एवढी माफक फी घेतली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी अरविंद चांडवले ९५४५६६९२४५, संताजी देशमुख ९४२३२७२४६६, बाजीराव पाटील ९४२१९१८७०१, हैबतराव पावणे ९८६०८१०७८७,  लतादेवी बाळकृष्ण बोराडे ९९७०६८७०८४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन विधवा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे यांनी केले असून या योग शिबिरास सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी आहे. तसेच महिला व पुरुषांच्या योगसाधनेसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्थाही करण्यात आली असून, या शिबिरात भाग घेणाऱ्या शिबिरार्थींनी स्वत: बसण्यासाठी चट ई आणावी लागणार आहे. सदर कोर्सची वेळ ही सकाळी ६.०० ते सकाळी ७.०० असून जवळे मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड हाकेवाडी या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त स्त्री-पुरुषांनी या शिबिरात भाग घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies