म्हसवड येथे तालुकास्तरीय श्रामणेर शिबीर सुरु - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 8, 2018

म्हसवड येथे तालुकास्तरीय श्रामणेर शिबीर सुरु


म्हसवड येथे तालुकास्तरीय श्रामणेर शिबीर सुरु 
माणदेश न्यूज नेटवर्क
 म्हसवड/अहमद मुल्ला : जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गोतम बुद्ध यांच्या धम्माचे आचार-विचार मानवमुक्तीच्या मार्गावर नेणारा एकमेव धर्म म्हणजे बौद्ध धम्म होय. या धम्माची शिकवण गावा-गावात रुजावी यासाठी श्रामणेर शिबिराचे तालुकास्तरीय आयोजन म्हसवड या ठिकाणी  पूज्य भंन्तेजी सारिपुत्त यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, हे म्हसवडकरांचे भाग्य असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव सुनिल संकपाळ यांनी म्हसवड येथे श्रामणेर शिबीराच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.
म्हसवड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे, माण तालुका बौध्दाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पुळकोटी, वरकुटे, धुळदेव, हिंगणी, दिवड आदी गावातुन सोळा श्रामणेर ४ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१८ विजयादशमी इतके दिवस हे शिबीर चालणार आहे. शिबिरात बौद्ध धम्माची शिकवण, धम्माचे आचरण, प्रसार व प्रचार त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’  आदी विषयावर बौध्द धम्माचे केंद्रीय शिक्षक सखोल मार्गदर्शन, पहाटे पाच ते रात्री आठपर्यंत करणार आहेत. या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रीय शिक्षक वेगवेगळे विचार मांडणार आहेत.
या शिबीराचे उदघाटन पुज्य भन्ते सारिपुत्त यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित श्रामणेर शिबिरास बसलेल्या सोळा शिबीर्थीना चिवरदान करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष गायकवाड, केंद्रीय शिक्षक बी.डी.कांबळे ,पाटणकरसाहेब, माण तालुकाध्यक्ष सुनिल भोसले,कोषाध्यक्ष कुमार सरतापे,सुरेश चंदनशिवे,सचिन सरतापे,वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब खरात,शिवदास सरतापे,शशी देठे,अंगुली बनसोडे आदी बौध्दबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Advertise