Type Here to Get Search Results !

दिघंची येथे होणार दि. २१ रोजी रस्ते कामाचा उद्घाटन समारंभ, नाम. चंद्रकातदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती; रस्ते कामासाठी 640 कोटी रुपये निधी मंजूर-आ.बाबर


रस्ते कामासाठी 640 कोटी रुपये निधी मंजूर-
आमदार अनिलभाऊ बाबर 
दिघंची येथे होणार दि. २१ रोजी रस्ते कामाचा उद्घाटन समारंभ, नाम. चंद्रकातदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती


माणदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी : हॅब्रीड अॅनिटी या योजनेतून राज्य शासनामार्फत रस्ते विकास कामासाठी ६४०कोटी रुपये  रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या कामांच्या उद्घाटनासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती खानापूरचे आ.अनिल बाबर यांनी दैनिक माणदेश एक्सप्रेस बोलताना दिली.

आरवडे ते दिघंची या टोप-वडगाव-आष्टा-तासगाव, भिवघाट-आटपाडी-दिघंची राज्यमार्ग क्रमांक 151 या कामासाठी 209 कोटी रुपये, आटपाडी ते सलगरे या आटपाडी-शेटफळे-कोळे-घाटनांद्रे-कवठेमंकाळ-सलगरे-मिरज-हेरवाड या राज्यमार्ग क्रमांक 153 साठी २०१ कोटी रुपये, मायणी ते दिघंची रस्त्यासाठी 123 कोटी रुपये व दिघंची ते पंढरपूर रस्त्यासाठी 155 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. हे रस्ते वर्दळीचे असून, बऱ्याच दिवसांपूर्वी अशी कामे झालेली आहेत. त्यामुळे त्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. निरंतर वाहतुकीसाठी हे रस्ते वापराचे प्रमाण कमी झालेले होते. परंतु या रस्त्यांच्या कामाची पूर्तता झाल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे. हॅब्रीड अॅनिटी या योजनेतून राज्य शासनामार्फत या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असून त्याच्या उद्घाटनासाठी दि. २१ रोजी दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies