Type Here to Get Search Results !

वंजारी विकास महासंघाचे वार्षिक आधिवेशनासाठी उपस्थित रहा:-समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले

वंजारी विकास महासंघाचे वार्षिक आधिवेशनासाठी उपस्थित रहा:- लक्ष्मणभाऊ उगलमुगले
माणदेश न्यूज नेटवर्क :-  अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज विकास महासंघाचे वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 30 /9/2018 रोजी सकाळी 11 वाजता यल्लम रेड्डी धर्मशाळा आळंदी चौक आळंदी येथे आयोजित केले आहे.वंजारी समाज बांधवांनी अस्तिवत्वाच्या लढ्याला सज्ज होण्यासाठी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची विनंती समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी केली आहे. 
वंजारी समाजाला वाढवून आरक्षण मिळाले पाहीजे. या एकाच विषयावर आधिवेशनात कायदे विषयक अभ्यासु मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यात येणार आहे. त्याला जोडुन खुले आधिवेशन होईल. संघटना बांधनीवर चर्चा होईल. पुढील तीन वर्षासाठी पदाधिकारी निवड होईल. ज्यांना निःस्वार्थी समाज सेवा करण्याची आवड आहे. त्यांना संधी दिली जाईल समाजाचे अनेक पश्र आहेत. त्यावर चर्चा होईल. महाराष्ट्रात एक कोटी वीस लाख समाज आहे. पण समाजाचे अस्तित्व जाणवत  नाही म्हणुन समाज एक संघ करण्याची गरज आहे. यावर नियोजन करण्यात येईल. नोकर भर्तीत विद्यार्थ्यावर अन्याय होत आहेत. सेवेत असणारे समाजाचे अधिकारी, कर्मचारी यांचेवर आन्याय होत आहेत. ऊस तोड मजुर म्हणुन वंजारी समाजाची ओळख होत आहेत. ऊस मजुरांचे कुटूंबावर अन्याय होत आहेत. समाजाचे विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक सवलती मिळत नाहीत. ग्रामीण भागात रोज मजूरी केल्याशिवाय चुल पेटत नाही. गरीबी मुळे समाजाची मुले-मुली उपवर झाली. लग्न होत नाही. समाज कठीण संकटांचा सामना करत आहे. जीवन जगण्याचा मार्ग सापडत नाही. यावर एकच मार्ग आहे. वंजारी समाज एकसंघ झाला पाहीजे. अन्याया विरूद्ध लढाई केली पाहीजे. तर वंजारी बांधवानी मोठया संख्यने आधिवेशनात सहभागी व्हावे असे अहवान राष्ट्रीय अध्यक्ष रामराव लव्हारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अध्यक्ष कालेरू नरेश, महासचिव रामराव बिक्कड, महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब ढाकणे, प्रदेश सरचिटणीस समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले, प्रदेश उपाध्यक्ष यमनाजी आघाव, सुरेश हेमके, सुरेश ढाकणे, जयपाल फड, राष्ट्रीय संपर्क प्रमुख विजय कालेवार नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रकांत सांगळे, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुष्माताई दराडे राज्य संपर्क प्रमुख विठ्ठलराव तांदळे ,भाऊसाहेब लटपटे ,राज्य सल्लागार, नवनाथ गर्जे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तांदळे महाराज कार्यक्रम प्रमुख यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बंधु -भगिनींना केले  यावेळी रामकिसन सोनवणे, गोरक्षनाथ विघ्ने,किसनराव गर्जे,विष्णू फुंदे, भागवत बडे, विकास बडे पोपटराव दराडे,शिवाजी आव्हाड,बंशीभाऊ उगले, किरण सोनवणे, भाऊसाहेब दिघोळे भानुदास आंधळे प्रेमनाथ घुगे उपस्थित होते. 
यावेळी एक वंजारी, लाखाला भारी,तुमचं आमचं नात काय जय भगवान जय गोपीनाथ या घोषणेचा उदय झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies