'सही पोषण देश रोशन'ची कडेगावात सुरवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 9, 2018

'सही पोषण देश रोशन'ची कडेगावात सुरवात'सही पोषण देश रोशन'ची कडेगावात सुरवात
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव शहरातील नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील माळीनगर येथील अंगणवाडी क्र.२४ मध्ये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत आहार प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामुळे पुरक आहाराचे महत्व पटवुन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात आले. तसेच तालुक्यात कोठेही न भरलेल्या छोट्या अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांचा बाजारही या दिवशी भरविण्यात आला होता. अंगणवाडी सेविका सौ.शुभांगी जोतिराम देशमुख यांनी अतिशय नेटके संयोजन केले होते. प्रामुख्याने यामध्ये पौष्टीक पदार्थांचे प्रदर्शन व अंगणवाडी मधील चिमुकल्या बालकांचा भाजी बाजारही भरविण्यात आला होता. गरोदर स्तनदा मातांची प्रतिरूपे साकारण्यात आली होती. यावेळी अंगणवाडी सेविका सौ.शुभांगी देशमुख यांनी मार्गदर्शन करतेवेळी पोषण आहार व त्याचे महत्त्व उखाण्याच्या माध्यमातून सांगितले. यावेळी कार्यक्रमास कडेगाव पंचायत समिती सभापती सौ.मंदाताई करांडे,पंचायत समिती प्रकल्पाधिकारी कलावती शिखरे, कडेगांव नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापती सौ.अश्वीनी वेल्हाळ,सौ.शांता घाडगे तसेच पालक,माता,भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:

Post a Comment

Advertise