गदिमांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त शेटफळेत साहित्य मेळाव्याचे आयोजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 28, 2018

गदिमांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त शेटफळेत साहित्य मेळाव्याचे आयोजन


गदिमांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त शेटफळेत साहित्य मेळाव्याचे आयोजन
प्रा. संभाजीराव गायकवाड यांच्या 'चुकलेली पाऊल' या कथासंग्रहाचे होणार प्रकाशन
माणदेश न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त त्यांची जन्मभूमी असलेया शेटफळे येथे सोमवार (ता.1) रोजी पारावरील साहित्यिक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती गदिमा स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.सयाजीराजे मोकाशी  यांनी दिली.
ग. दि .माडगूळकर स्मारकात या पारावरील मेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी १०.०० वा. खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.  उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इंगवले असून प्रा.विश्वनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे. ११.३० वाजता प्रा. संभाजीराव गायकवाड यांच्या 'चुकलेली पाऊल' या कथासंग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. दुपारच्या सत्रात कवी संमेलन होणार असून त्याचे अध्यक्ष शाहीर हरिभाऊ गळवे आहेत. तर सूत्रसंचालन प्रा. सुभाष कवडे करणार असून कविसंमेलनाला ज्ञानेश डोंगरे, मेघा पाटील, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कविसंमेलनाला संपल्यावर शिवाजीराव बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आयोजित केले आहे. यावेळी प्रा. संभाजीराव गायकवाड आणि तनिष्का गायकवाड यांच्या कथेचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise