Type Here to Get Search Results !

आखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दत्ता केंगार यांची निवड...

आखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दत्ता केंगार यांची निवड...
वरकुटे-मलवडी / प्रतिनिधी : वरकुटे मलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ता शंकर केंगार यांची म्हसवड ता.माण येथे झालेल्या आखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या मेळाव्यात सातारा जिल्हा उपाध्यक्ष(A गट) पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी मा.कोकण आयुक्त श्री.प्रभाकरजी देशमुख, महाराष्ट्र होलार समाज अध्यक्ष श्री.शहाजी पारशे,माण तालुका अध्यक्ष श्री.तानाजी ऐवळे,सचिव श्री.आबासाहेब केंंगार,आबासाहेब ऐवळे,वसंत तोरणे, आबा नामदास आदी समाजबांधव उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या  शिका,संघटित व्हा,संघर्ष करा,शिकवणीला अनुसरून आजमितीला महाराष्ट्रातील सर्वच समाज मोठ्या प्रमाणात संघटीत होत आहेत. महाराष्ट्रात अल्पसंख्याक असलेला समस्त होलार समाज एकत्रीत येवून संघटित झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर  होलार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रबोधन करीत आहेत.याच धरतीवर सर्व जिल्ह्यातील होलार समाज संघटित करून अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी हि संघटना प्रयत्नशील राहणार आहे .वरकुटे मलवडी येथील सर्वसामान्य कार्यकर्त्याची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies