दि. 26 रोजी आटपाडी तालुका आरपीआय (ए) ची बैठक: विशाल काटे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 22, 2018

दि. 26 रोजी आटपाडी तालुका आरपीआय (ए) ची बैठक: विशाल काटे

दि. 26 रोजी आटपाडी तालुका 
आरपीआय (ए) ची बैठक: विशाल काटे 
बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.
माणदेश न्यूज नेटवर्क : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आटपाडी तालुका प्रमुख पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आरपीआय चे आटपाडी तालुका प्रसिद्ध प्रमुख विशाल काटे यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या 61 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम 03/10/18  रोजी ठाणे (मुंबई)  येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आटपाडी तालुक्यातुन  मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्यासंदर्भात व नविन युवक कार्यकर्त्याना संधी दिली जाणार असल्याने या संदर्भात आटपाडी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक  बुधवार दि.26/9/18 रोजी दुपारी 11.00 वाजता  शासकीय विश्रामगृह आटपाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.  तरी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी या बैठकीसाठी हजर रहावे. या बैठकीसाठी  आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, प्रवक्ते रणजीत ऐवळे,  मातंग आघाडी तालुका अध्यक्ष  महादेव रणदिवे हे मार्गदर्शन करणार आहेत. 
तरी जास्तीत-जास्त संख्येने या बैठकीसाठी हजर राहण्याचे आवाहन आरपीआयचे आटपाडी तालुका प्रसिद्धी प्रमुख विशाल काटे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise