Type Here to Get Search Results !

ऊस बिला संदर्भात दि. 24 सप्टें रोजी राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या वाड्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन- महेश खराडे

ऊस बिला संदर्भात दि. 24 सप्टें रोजी राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या वाड्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन- महेश खराडे 
माणदेश न्यूज नेटवर्क : माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गत दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत ती ऊस बिले तातडीने द्यावीत या प्रमुख मागणीसाठी सोमवार दि 24 सप्टेंबरपासून कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या वाड्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
       खराडे म्हणाले माणगंगा कारखान्यात गाळप झालेल्या ऊसाची दोन वर्षापासून बिले थकीत आहेत या पूर्वी दोनदा कारखान्यावर मोर्चे काढले कारखाण्यावर दगडफेकही केली त्यावेळी काही शेतकऱ्याची बिले देण्यात आली उर्वरित शेतकऱ्याच्या बिळासाठी 27 ऑगस्ट रोजी पुन्हा मोर्चा काढला हा मोर्चा त्याच्या वाड्यावर काढण्यात आला त्यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी 15 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्याची थकीत बिले देतो असे लेखी पत्र दिले मात्र त्यावेळीच आम्ही त्यांना इशारा दिला होता जर 15 सप्टेंबरपर्यंत बिले दिली नाही तर वाड्यासमोर शेकडो शेतकर्यासाहित ठिया आंदोलनास बसणार आहोत 19 सप्टेंबरपर्यंत अद्याप बिले दिलेली नाहीत त्यामुळेच सोमवार दि 24 सप्टेंबर  रोजी सकाळी दहा वाजल्यापासून  बेमुदत ठीय्या आंदोलनास प्रारंभ होणार आहे जो पर्यंत बिले खात्यावर जमा होत नाहीत तो पर्यंत तेथून हलायचे नाही असा निर्धार शेतकर्यांनी केला आहे शेतकरी संतप्त आणि आक्रमक झाले आहेत दोन वर्षापासून हेलपाटे मारूनही बिल मिळत नसेल तर आता बिल घेतल्याशिवाय उठायचे नाही अशी शपथ घेऊनच आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनात तासगाव आटपाडी खानापूर वाळवा सांगोला माळशिरस खेड तालुक्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत आंदोलनाची जोरदार तयारी सुरु असून सर्व शेतकरी आंदोलनकाळात घरोघरी भाकरी मागून जेवणार आहेत तरी बिल राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शेवटी खराडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies